महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६ लाख ५ हजार ६४ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. मागील २४ तासात ७ हजार ८०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.४४ टक्के झाला आहे. आज राज्यात ४ हजार ४९६ नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. मागील २४ तासात १२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६३ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात आज 4496 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7809 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1605064 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 84627 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.44% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 12, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६ लाख, ६४ हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ३६ हजार ३२९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८, ११, ०३५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ६ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ८४ हजार ६२७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आजज राज्यात ४ हजार ४९६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १७ लाख ३६ हजार ३२९ इतकी झाली आहे.
आज नोंद झालेल्या १२२ मृत्यूंपैकी ८५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत. तर ३७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत असंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 7:47 pm