News Flash

पालघर  जिल्ह्यसाठी दुचाकी रुग्णवाहिका

एक चाक जोडून त्यावर स्ट्रेचर, प्राणवायू, अतिरिक्त बॅटरी, पंखा अशी  संपूर्णत: विलगीकरण केलेली रुग्णवाहिका आहे

स्ट्रेचर, प्राणवायू, अतिरिक्त बॅटरी, पंखा या सुविधांचा अंतर्भाव

पालघर : प्रोजेक्ट आरोग्यम् उपक्रमाअंतर्गत अ‍ॅलर्ट सिटिझन फोरम आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मार्फत पालघर जिल्ह्यसाठी या दुचाकी (बाइक) रुग्णवाहिका पुरवण्यात आल्या आहेत.  अधिक एक चाक जोडून त्यावर स्ट्रेचर, प्राणवायू, अतिरिक्त बॅटरी, पंखा अशी  संपूर्णत: विलगीकरण केलेली रुग्णवाहिका आहे.  विशेषत: गरोदर महिला आणि गंभीर रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका तयार करण्यात आली असल्याची माहिती  संस्थेचे संस्थापक निरंजन आहेर यांनी या वेळी दिली.

रुग्णवाहिकेचे चालक हे वैद्यकीय ज्ञान असणारे (वैद्यकीय प्रशिक्षित स्वयंसेवक) असून संस्थेचा या उपक्रमातून आदिवासी भागासाठी जेथे चार चाकी वाहन पोहोचू शकत नाही अशा ठिकाणांसाठी रुग्णवाहिका उपयोगी पडतील. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार श्रीनिवास वनगा आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

पालघर जिल्ह्यतील अतिदुर्गम भागात रस्त्याशी जोडले न गेलेले २२ पाडे असून पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही गरोदर मातांना झोळीतून रुग्णालयात आणावे लागते. हा प्रश्न लक्षात आल्यावर अ‍ॅलर्ट सिटिझन फोरम आणि एसबीआयने ही संकल्पना अमलात आणली. ज्या रस्त्यावरून दुचाकी जाते त्या रस्त्यावरून या रुग्णवाहिकेतून गरोदर मातांना किंवा गंभीर स्थितीतील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे शक्य होईल तसेच त्यामुळे रुग्णांचे जीव वाचून मातामृत्यू ही टळतील असे मत या वेळी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले. रुग्णवाहिका जव्हार, मोखाडा सारख्या दुर्गम ठिकाणी तसेच जिल्ह्यतील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पुरवण्यात येतील. सध्या दोन रुग्णवाहिका संस्थेने दिल्या असून आणखी २३ रुग्णवाहिका संस्थेकडून पुरवण्यात येणार आहेत अशी माहिती या वेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:26 am

Web Title: two wheeler ambulance for palghar district ssh 93
Next Stories
1 कारखाने सुरू असल्याने करोना संसर्गाचा धोका
2 रानडुक्करांची सागरीमार्गाने गावात घुसखोरी
3 विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची पळापळ
Just Now!
X