महाविकास आघाडीचं खातेवाटप जवळपास निश्चित झालं असून महत्त्वाचं असं गृहखातं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळतील असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी महसूल खाते काँग्रेसला तर अर्थखाते राष्ट्रवादीला मिळण्याचे सुतोवाच केले आहे.