अविवाहित व्यक्ती यशस्वी ठरतात असे अजब तर्कट योगगुरु रामदेव बाबा यांनी मांडले आहे. अविवाहित व्यक्तींनी मिळवलेल्या यशाची माहिती देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दाखला दिला आहे.

योगगुरु रामदेव बाबा  यांच्या हस्ते शुक्रवारी कर्जतमध्ये एका मालिकेच्या चित्रिकरणाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी बोलताना रामदेव बाबा यांची गाडी थेट अविवाहित पुरुषांवर घसरली. अविवाहित पुरुषच जीवनात यशस्वी ठरतात. राहुल गांधी, नरेंद्र मोदी हे याचे उदाहरण असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले. तुम्हालाही मोदींसारखे यशस्वी व्हायचे असल्यास लग्न करु नसा असा सल्लाच त्यांनी उपस्थितांना दिला. महाराष्ट्रातही लग्नापूर्वी पाच वेळा सावधानतेचा इशारा दिला जातो. त्यानंतरच लग्न होते असे रामदेव बाबांनी सांगतात उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

Sanjay Raut, Narendra Modi, Jalgaon,
नरेंद्र मोदींची हवा संपली, संजय राऊत यांचा दावा
fact check around 12 years old video of nitin gadkari criticizing former pm manmohan singh govt falsely linked to lok sabha election 2024
“पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी…”; नितीन गडकरींची पंतप्रधान मोदींवर टीका? व्हायरल VIDEO मागील सत्य काय? वाचा
lokmanas
लोकमानस: मोदींचे ‘गेमिंग’बद्दलचे मत धक्कादायक
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”

अविवाहित पुरुषांवर विधान करण्याची रामदेव बाबा यांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी  नोटाबंदीच्या निर्णयावरुन रामदेव बाबा यांनी अविवाहित पुरुषांवर भाष्य केले होते. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका लग्नसमारंभांना बसला. केंद्र सरकारच्या निर्णयावर संतापही व्यक्त होत होता. शेवटी केंद्र सरकारने लग्नासाठी बँकेतून अडीच लाख रुपये काढण्याची परवानगी दिली होती. योगगुरु रामदेव बाबा यांनी हा निर्णय घेताना भाजपचे नेमके काय चुकले याचे उत्तर दिले होते. भाजपचे नेते अविवाहित आहे,त्यांना लग्नसराईचा काळ लक्षात आला नाही आणि हीच त्यांची चुक होती असे बाबा रामदेव यांनी म्हटले होते. एकीकडे रामदेव बाबा हे मोदींचे समर्थक असले तरी नोटाबंदीवरुन त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.