13 December 2017

News Flash

पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस

पुण्यासह राज्याच्या काही भागात शनिवारी, सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. कोल्हापूर-सांगली, बीड-परभणी

विशेष प्रतिनिधी, पुणे | Updated: March 17, 2013 1:05 AM

पुण्यासह राज्याच्या काही भागात शनिवारी, सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. कोल्हापूर-सांगली, बीड-परभणी आणि नागपूरसह काही भागात शुक्रवारी चांगला पाऊस पडल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. रविवारीसुद्धा ढगाळ हवामान कायम राहून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. पुण्यात सायंकाळपर्यंत २.६ मिलिमीटर इतका पाऊस नोंदवला गेला. इतरही काही भागात शनिवारी पावसाची नोंद झाली. त्यापूर्वी शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पुण्यात ०.२ मिलिमीटर पाऊस झाला होता. याशिवाय कोल्हापूर (३.५ मिलिमीटर), सांगली (०.२), परभणी (१३.४), नागपूर (११.३), बीड येथेही बराच पाऊस पडला. पुण्यात ढगांच्या गडगडाटात काही गारांचाही वर्षांव झाला. इतर भागातही जोरदार सरी पडल्या.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास व दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसाची नोंद २.६ मिलिमीटर इतकी झाली.  रविवारीसुद्धा सलग तिसऱ्या दिवशी काही सरी बरसण्याची शक्यता आहे.

First Published on March 17, 2013 1:05 am

Web Title: unseasonal hurricane rain hit pune as well many places of of maharashtra