22 September 2020

News Flash

पत्नी प्रियकरासोबत पळाली, नवऱ्याने पोटच्या मुलींची हत्या करुन पाठवले फोटो

पत्नीच्या प्रेम प्रकरणामुळे त्रस्त असलेल्या आयटीआयच्या एका ४० वर्षीय शिक्षकाने पोटच्या दोन मुलींची हत्या करुन त्यांचे फोटो पत्नीला पाठवले.

महाराष्ट्रातील बल्लारपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या प्रेम प्रकरणामुळे त्रस्त असलेल्या आयटीआयच्या एका ४० वर्षीय शिक्षकाने पोटच्या दोन मुलींची हत्या करुन त्यांचे फोटो व्हॉटसअॅपवरुन विभक्त झालेल्या पत्नीला पाठवले. या शिक्षकाने सुद्धा आत्महत्या करुन जीवन संपवले. ऋषीकांत असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

ऋषीकांतच्या पत्नीचे स्थानिक ड्रायव्हरसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. त्यामुळे तो त्रस्त होता असे ऋषीकांतचा भाऊ गोपाळ.सी.कुदूपाल्लीने सांगितले. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली असे पोलीस अधिकारी सुनील कांबळे यांनी सांगितले.

ऋषीकांतची पत्नी काही दिवसांपूर्वी ड्रायव्हरसोबत पळून गेली होती असे गोपाळ.सी.कुदूपाल्लीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. एक मुलगी सहा वर्षांची तर दुसरी मुलगी दीडवर्षांची आहे. पत्नीचे प्रेम प्रकरण आणि ती घरातून पळून गेल्यामुळे ऋषीकांतने हे टोकाचे पाऊल उचलले असा दावा त्याचा भाऊ गोपाळ.सी.कुदूपाल्लीने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 11:35 am

Web Title: upset over wifes affair man kills daughters
Next Stories
1 निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व संपल्यावर विसर असे आता तरी घडू नये – उद्धव ठाकरे
2 दोन चिमुकल्या मुलींसह पित्याची आत्महत्या
3 तूर्तास पाण्याची चिंता नाही!
Just Now!
X