महाराष्ट्रातील थोर विचारवंत शिक्षणतज्ञ, पंचायत राज व्यवस्थेचे प्रणेते आणि नवेगाव आंदोलनाचे प्रणेते प्रा. डॉ. पी. बी. पाटील यांचे आज सकाळी सांगलीत त्यांच्या राहत्या घरी दुख:द निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. शांतीनिकेतन लोकविद्यापीठाचे संस्थापक असलेले डॉ. पाटील यांनी या भागातील शिक्षण आणि ग्रामविकासात मोलाचे योगदान दिले होते.
डॉ. पी. बी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी हुतात्मा स्मारकावर ठेवण्यात आले आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी पी. बी. पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पालकमंत्री पतंगराव कदम यांनी सरकारच्या वतीने पी बी पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पहार श्रद्धांजली वाहिली.