जिल्ह्यात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला. शेतकऱ्यांना ३७ कोटी ६० लाख ६४ हजार ५७५ रुपये नुकसानभरपाईची प्रतीक्षा होती. यातील पहिल्या टप्प्यात प्राप्त ११ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वाटपासाठी तहसील कार्यालयाकडे वितरीत केला.
एकूण २९ हजार २२९.८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाले. पीक नुकसानीबाबत िहगोली तालुक्यात जिरायत पिकांसाठी ४ कोटी ५१ लाख ६० हजार, बागायत पिकांसाठी ७४ लाख ८९ हजार ५००, फळबागेपोटी ७८ लाख ३२ हजार ५०० अशी एकूण १२ कोटी ३४ लाख ८२ हजार रुपये निधीची मागणी करण्यात आली. पैकी ३ कोटी ६१ लाख १८ हजार ८५० रुपये रक्कम वितरित करण्यात आली.
कळमनुरी तालुक्यात ५ कोटी ७३ लाख, सेनगाव ८ कोटी ६४ लाख ४७ हजार ५००, वसमत ९ कोटी ८० लाख ८ हजार ५७५, तर औंढा नागनाथ तालुक्यात १ कोटी ७३ लाख ९६ हजार ५०० रुपये निधीची मागणी करण्यात आली. या तालुक्यांत वितरण झालेला निधी कळमनुरी १ कोटी ४८ लाख ३८ हजार ६७५, सेनगाव २ कोटी ५२ लाख ८६ हजार १४९, वसमत  २ कोटी ८६ लाख ६७ हजार ७८९, तर औंढा नागनाथ तालुक्यात ५० लाख ८८ हजार ५२८ असा आहे.
दरम्यान, सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजनुसार मिळणारी मदत बाधित शेतकऱ्याने धारण केलेल्या एकूण क्षेत्रावर आधारित नसून प्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी परंतु जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत अनुज्ञेय राहणार आहे.