News Flash

लसीकरणात महाराष्ट्र पुन्हा अव्वल! एका दिवसात आठ लाखांचा टप्पा केला पार

लस घेतलेल्या एकूण लाभार्थ्यांच्या संख्येत राज्याचा देशात पहिला क्रमांक कायम

राज्याने सर्वाधिक लसीकरणाचा आपला विक्रम अबाधित राखला आहे.

करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत उत्तमोत्तम कामगिरी करत महाराष्ट्राने लसीकरणाचा उच्चांक कायम राखला आहे. आज समोर आलेल्या आकडेवारीनुासर हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राने लसीकरणाच्या बाबतीतलं आपलं आघाडीचं स्थान कायम राखलं आहे. राज्यात आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ७ लाख ८५ हजार ३११ लाभार्थ्यांनी लस घेतली. ही एका दिवसातली सर्वाधिक आकडेवारी आहे.

गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाच्या बाबतीत राज्य देशात आघाडीवर आहे. एका दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्याचा विक्रम राज्याने अबाधित राखला आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत राज्यात ७ लाख ८५ हजार ३११ लाभार्थ्यांनी लस घेतली. एका दिवसातली ही सर्वाधिक आकडेवारी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा- महाराष्ट्राची केंद्राकडे दीड कोटी जादा लसींच्या डोसची मागणी!

ते म्हणाले, अजूनही लसीकरण सुरु आहे. आपण आजच्या दिवसात आठ लाखांचा आकडा नक्की पार करु. गेल्या महिन्यात २६ जून रोजी एका दिवसात ७ लाख ३८ हजार ७०४ नागरिकांच्या लसीकरणाची विक्रमी नोंद झाली होती. हा आकडा राज्याने पार केला असून आपला हा विक्रम मोडला आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत तीन कोटी ३८ लाख ५७ हजार ३७२ नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. हा देशातला आत्तापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 8:32 pm

Web Title: we have administered highest ever figure for the state and vaccination is still in progress said pradeep vyas vsk 98
Next Stories
1 “ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागणीला यश”
2 नवी मुंबईत बोगस लसीकरणाचा प्रकार उघड ; ३५२ जणांना दिली होती लस!
3 “बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले?”; फडणवीसांचा सवाल!
Just Now!
X