05 April 2020

News Flash

बिबटय़ास बघून घाबरलेल्या महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी करत वनविभागावर आपला संताप व्यक्त केला

प्रतिनिधिक छायाचित्र

संगमनेर : अचानकपणे समोर उभा ठाकलेला बिबटय़ा बघून घाबरलेल्या एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. शहराजवळ असलेल्या जाखुरी गावात ही घटना घडली.  शीलाबाई लहानु पानसरे (वय ४८) असे या महिलेचे नाव आहे.

शीलाबाई पानसरे ही महिला शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये काम करत असताना अचानक तिच्यासमोर बिबटय़ा प्रकट झाला. समोर उभा ठाकलेल्या बिबटय़ा बघतात शीलाबाई पानसरे यांची मोठी धावपळ उडाली. अत्यंत भेदरलेल्या शीलाबाई यांना तेथेच हृदयविकाराचा झटका आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

शनिवारी घडलेल्या प्रकाराची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर भाग १ चे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे, वनरक्षक एस. आर. पाटोळे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी करत वनविभागावर आपला संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत मयताच्या कुटुबीयांना वनविभागाकडून मदत मिळण्याची मागणी केली. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून मृत महिलेचा अंगावर कोणतीही जखम दिसली नसल्याचे सांगण्यात आले. वनविभागाकडून बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी  झाले किंवा मृत्यू झाला तरच मदत मिळते असे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2020 12:27 am

Web Title: woman scared to death by heart attack after leopard seeing zws 70
Next Stories
1 ‘फेसबुक मैत्री’च्या माध्यमातून शिक्षिकेला २१ लाखांचा गंडा!
2 चाइल्ड पोर्नोग्राफीचे दोन गुन्हे दाखल, १४ जणांचा शोध सुरू
3 शाळकरी मुलीवर तरुणाकडून बलात्कार, आरोपीस अटक
Just Now!
X