वाई : साताऱ्यातील महाबळेश्वर पाचगणी या पर्यटन स्थळावर मतदानाची शाई दाखवल्यास खाद्यपदार्थांवर सवलत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी वॅक्स म्युझियम मोफत सफर पुढील दोन दिवस मोफत मिळणार आहे.

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत असून या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून अनेकविध उपक्रम राबविण्यात येत आहेत अशाचप्रकारे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथील लिंगमळा परिसरात असलेल्या प्रसिद्ध मेघना फूड स्टुडिओ पाचगणी येथील नमस्ते हॉटेलमध्ये मतदानाचा टक्का वाढावा या उदात्त हेतूने ‘शाई दाखवा अन् खाद्यपदार्थांवर २५ ते ५० टक्के सूट मिळवा’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्यानुसार मतदानाच्या दिवशी मतदान केलेल्यांना बोटावरील शाई दाखवून खाद्यपदार्थांवर तब्बल २५ टक्के सूट मिळणार आहे पाचगणित ५० टक्के सूट मिळणार आहे. तसेच पुढील दोन दिवस मेघना वर्ल्ड वॅक्स म्युझियमची देखील मोफत सफर सातारा जिल्ह्यातील नागरिकांना आपले मतदार कार्ड व शाई दाखविल्यास घडणार आहे

आणखी वाचा-अक्कलकोटमध्ये वटवृक्ष स्वामी समर्थ १४६ वा पुण्यतिथी सोहळा

सातारा लोकसभा मतदार संघात मतदानाची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. मतदान केंद्रावरुन निवडणूक साहित्य तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन जाण्यासाठी व परत आणण्यासाठी एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे साताऱ्यातील बस वाहतुक प्रभावित झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपले नियोजन करूनच प्रवास करावा .

महसूल, आरोग्य, या विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एकूण २२ हजार कर्मचारी रात्रंदिवस निवडणूक कामकाजात व्यस्त आहेत. मतदानासाठी ४३३ बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. मतदार संघात२३१५ मतदान केंद्रे आहेत. राज्यात सर्वाधिक तरुण मतदार सातारा जिल्ह्यात आहेत. सातारा शहर फलटण वाई म्हसवड येथील संवेदन केंद्रावर काळजी घेण्यात येत आहे प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर; वरिष्ठांच्या भेटीनंतर घेतला ‘हा’ निर्णय

जिल्हा मतदान केंद्रावर आकर्षक मतदान केंद्र तयार करण्यात आले असून त्यासाठी वेगवेगळ्या थीम सातारा महाबळेश्वर व वाई येथे राबवण्यात आल्या आहेत .त्याप्रमाणे मतदान केंद्रे सजविण्यात आली आहे. अनेक मतदान केंद्राचा कारभार महिला पाहणार आहेत. मतदान केंद्रावर उन्हाची झळ मतदारांना बसू नये यासाठी मतदान केंद्र बाहेर आकर्षक मंडप उभारण्यात आले आहेत. महाबळेश्वर येथे वेगवेगळ्या पॉईंटच्या आकाराची आकर्षक मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत त्याची जबाबदारी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वाई महाबळेश्वर खंडाळा येथे मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची व मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान करावे असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे.