News Flash

कलागुण जपले तर ताण कमी होतो: अमृता फडणवीस

... तर यश नक्कीच मिळेल

कलागुण जपले तर ताण कमी होतो: अमृता फडणवीस
अमृता फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

आजच्या महिला घर आणि नोकरी यांची जबाबदारी समर्थपणे पार पाडतात. पण असे करत असताना स्वतःच्या आवडी निवडीस विसरुन जातात. पण आपली आवड आणि कलागुण जपले तर आपल्या मन आणि शरीरावरील ताण कमी होण्यास मदत होते, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाअंतर्गत दुर्गा महिला मंचाच्यावतीने गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमृता फडणवीस या उपस्थित होत्या. महिलांनी आपली आवड आणि कलागूण जपले तर मनावरील आणि शरीरावरील ताण कमी होतो. आपण हाती घेतलेले जे काम आहे त्यात शंभर टक्के प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, असे त्यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या देखील उपस्थित होत्या. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सॅनिटरी वेन्डिंग मशीन आणि शाळांमध्ये आरोग्य रक्षक पेढीसाठी महिला आयोगातर्फे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी हेल्पलाईन

राज्य महिला आयोगातर्फे महिलांच्या समुपदेशनासाठी सुहिता ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली. सुहिता हेल्पलाईनचा नंबर ७४७७७२२४२ असा असून ही हेल्पलाईन कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2018 12:24 pm

Web Title: womens day 2018 hobbies will help you to reduce your stress says amruta fadnavis
Next Stories
1 १२ तारखेला विधान भवनावर धडकणार किसान सभेचा मोर्चा
2 Maharashtra Budget 2018: प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
3 कारवर ट्रक चढवला होता, पण मी वाचलो: प्रवीण तोगडिया
Just Now!
X