08 December 2019

News Flash

मतदान जनजागृतीसाठी ‘भावी मतदारां’चा मेळावा

पहिल्यांदाच मतदान करणारे महाविद्यालयीन युवक—युवतींनी उत्साहाने मतदान करून आपला हक्क् बजावलाच पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी संदेशफलकांचा वापर

राज्यात २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरीता मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग  (स्वीप ) अर्थात स्वीप  हा कार्यRम हाती घेण्यात आला होता.  या अनुषंगाने मतदारांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहचविला जात आहे. या अनुषंगाने विद्यार्थी मतदारांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून नेरुळ सेक्टर ५ येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालयात विद्यार्थी मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुप्रसिद्ध सिनेनाटय़ अभिनेते  पुष्कर श्रोत्री यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना लोकशाहीतील मतदानाचे महत्व पटवून दिले.मतदान हा आपला हक्क असून त्याव्दारे आपण भारतीय लोकशाही बळकट करतो असे सांगत त्यांनी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पहिल्यांदाच मतदान करणारे महाविद्यालयीन युवक—युवतींनी उत्साहाने मतदान करून आपला हक्क् बजावलाच पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

सध्याच्या लोकप्रिय कलावंताने केलेल्या आवाहनाला विद्यर्थ्यांंनी अत्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी महाविद्यलयातील एन.एस.एस.च्या विद्यर्थ्यांंनी मतदानाविषयी जनजागृतीपर पथनाटय़ सादर केले.  याप्रसंगी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्यासह स्वीप मोहिमेच्या प्रमुख  रेवती गायकर, १५१ बेलापूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, स्वीपचे नोडल अधिकारी महापालिका उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सहा. निवडणूक निर्णय अधिकारीचंद्रकांत तायडे आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  याप्रसंगी पालिका माध्यमिक शाळा R.१०१ शिरवणेचे विद्यर्थी उपस्थित होते.

First Published on October 10, 2019 1:21 am

Web Title: future voters rally for voting awareness akp 94
Just Now!
X