एकीकडं सत्तास्थापन करण्याचं महायुतीसमोर आव्हानं आहे. भाजपा आणि शिवसेनेतील तणाव अद्यापही कमी झालेला दिसत नाही. त्यात शिवसेनेनं #maharashtraneedsdevendra या हॅशटॅगचं फॅक्ट चेक करत पोलखोल केली आहे. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवे असतील, तर तशी मागणी करणारे ट्विट महाराष्ट्राबाहेरून कसे करण्यात आले,” असं शिवसेनेच्या नेत्यानं म्हटलं आहे.

जनतेनं महायुतीला जनादेश दिलं आहे, असं भाजपा-शिवसेनेती नेते सांगत आहे. मात्र, सत्ता स्थापनेच्या चर्चेवरून दोन्ही पक्षांनी एकमेकांकडं पाठ केली आहे. शिवसेनेच्या सत्तेच्या समसमान वाटपाच्या आग्रहामुळं राज्यातील सत्तास्थापनेचा गाडा अडकला आहे. शिवसेना मागणीवर ठाम असताना भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावर कोणतीही तडजोडीची भूमिका घेतली जाताना दिसत नाही.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी #maharashtraneedsdevendra असा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये होता. या हॅशटॅगचं शिवसेनेनं बिंग फोडत काही सवाल उपस्थित केले आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी या हॅशटॅगचं फॅक्ट चेक केलं आहे. जर महाराष्ट्रातील लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. तर ते मुख्यमंत्री व्हावे असे मागणी करणारे ट्विट महाराष्ट्राच्या बाहेरून इतक्या मोठ्या प्रमाणात ट्विट का करण्यात येत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. चतुर्वेदी यांनी महाराष्ट्रातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून किती ट्विट करण्यात आले, याची आकडेवारी नकाशासह ट्विटरवर पोस्ट केली आहे.