छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम आता थेट विधानसभा निवडणुक लढवणार आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्ष (बसपाने) छिंदमला अहमदनगर शहर या मतदारमधून निवडणुकीचे तिकीट दिले आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. तर युतीच्या जागावाटपामध्ये ही जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडल्याने येथून सेनेचे माजी आमदार अनिल राठोड निवडणुक लढवत आहेत.

२०१८ साली फेब्रुवारी महिन्यामध्ये फोनवरील संभाषणादरम्यान शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छिंदम चर्चेत आला होता. या प्रकरणामध्ये त्याला त्याचं पद गमवावं लागलं होतं. तसंच त्याला भाजपानेही पक्षाबाहेर हाकललं होतं. या सगळ्या गोष्टी घडूनही डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या अहमदगनर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये छिंदम अपक्ष म्हणून लढला. विशेष म्हणजे छिंदम प्रभाग क्रमांक ९ मधून एक हजार ९७० मतांनी अपक्ष म्हणून निवडूनही आला. त्यामुळे आता त्याने विधानसभा निवडणूक लढवण्याचाही निर्णय घेतला आहे. काही दिवसापूर्वीच छिंदमने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Dictatorship, Modi, PM,
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास हुकूमशाही; मला तुरुंगात जावे लागेल, सुशीलकुमार शिंदे यांचा भीतीयुक्त इशारा
Congress Officials, Congress Nagpur Issued Show Cause Notices, Non Performance in party election, Shivani waddetiwar, congress Nagpur Officials, congress news, marathi news, Shivani waddetiwar news,
…तर पदमुक्तीची टांगती तलवार! काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार, अभिषेक धवड यांना कारणे दाखवा नोटीस
Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
gadchiroli mahavikas aghadi dispute marathi news
गडचिरोलीत महाविकास आघाडीत अंतर्गत कलह; काँग्रेसच्या एककल्ली कारभारावर निष्ठावंतांसह मित्र पक्षांची नाराजी

छिंदमची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये छिंदम नगरच्या उपमहापौरपदी असताना ठेकेदाराशी उर्मट भाषेत बोलत होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही त्याने अपशब्द काढले. ज्यामुळे भाजपावर टीकेचे ताशेरे झाडण्यात आले. त्यानंतर भाजपाने त्याला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. महानगर पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर छिंदमला उपरती आल्याने त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण त्यांच्यासमोर नतमस्तक झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे व राज्याचे आराध्यदैवत असून त्यांच्यासमोर मी नतमस्तक होऊन हा विजय स्वीकारला असल्याचे त्याने माध्यमांसमोर सांगितले होते.