12 November 2019

News Flash

टीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार

टीव्ही ९ आणि सिसोरेचा एक्झिट पोल समोर

(संग्रहित छायाचित्र)

टीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ६०.५ टक्के मतदान झालं आहे. त्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर येते आहे. टीव्ही ९ सिसेरोच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला १२३, शिवसेनेला ७४, काँग्रेसला ४०, राष्ट्रवादीला ३५, मनसेला शून्य तर इतर पक्षांना १६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टीव्ही ९ सिसेरो एक्झिट पोलचा अंदाज

भाजपा : १२३
शिवसेना : ७४
काँग्रेस : ४०
राष्ट्रवादी : ३५
मनसे : ०
इतर : १६

महाआघाडी आणि महायुतीला किती जागा?
महायुती : १९७
महाआघाडी : ७५
इतर : १६

दुपारपर्यंत झालेल्या आकडेवारीवरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता निकाल काय लागणार ते पाहणं महत्त्वाचं आहे. सगळ्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. आता निकालाच्या दिवशी सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र एक्झिट पोलचे आकडे तरी हे सांगत आहेत की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे.

First Published on October 21, 2019 7:51 pm

Web Title: tv9 sisero exit poll says mahayuti government again scj 81