पिंपरी चिंचवडमध्ये वाहने तोडफोडीचे सत्र सुरुच, १७ वाहने फोडली

दोन टोळक्यांच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर, पोलिसांनी ५ जणांना घेतले ताब्यात, पाचही जणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे

पिंपरी-चिंचवड शहरात तोडफोडीचे सत्र सुरूच आहे.परंतु आता अज्ञात टवाळळखोरांचे धाडस वाढले असून पोलीस चौकीपासूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरातील १७ वाहनांची तोडफोड केली आहे. ही तोडफोड दोन टोळक्यांचा वादात मध्यरात्री झाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. त्यातील ५ जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सहा दुचाकीवरून ट्रिपसी आलेल्या इसमांच्या हातात कोयते,तलवारी आणि लाकडी दांडके होते त्यांनी दहशत माजवत १७ वाहनांची तोडफोड केली.याप्रकरणी अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

याप्रकरणी अमोल हनुमंत कदम यांनी भोसरी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.त्यानुसार गुन्हा दाखल केला असून ५ जणांना ताब्यात घेतलं आहे. या ५ जणांपैकी दोघे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मध्यरात्री रामनगर हौसिंग सोसायटी,आदिनाथ नगर भोसरी येथील परिसरातील सार्वजनिक रस्त्यांवर पार्क केलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनाची सहा दुचाकीवरून आलेल्या १६ इसमांनी कोयते,तलवार आणि लाकडी दांडक्याने तोडफोड केली आहे.ही तोडफोड दोन टोळक्यांचा वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे.परंतु दोन टोळक्यांचा वादात लोकांचे मोठे नुकसान होत आहे.तोडफोड करणाऱ्यात काही अल्पवयीन मुलांचा देखील सहभाग आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची चौकशी सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 17 vehicles were destroyed by unknown persons in pimpri chinchwad

ताज्या बातम्या