८ पट्टेदार वाघांचे मृत्यू वन विकास महामंडळाच्या जंगलात; वाघांचे संरक्षण करण्यात अपयश

चार छाव्यांचे मृत्यू व बेपत्ता वाघिणीचे प्रकरण गाजत असतानाच जिल्हय़ात गेल्या चार वर्षांत २५ पट्टेदार वाघ व ३० बिबटय़ांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ८ पट्टेदार वाघांचे मृत्यू वन विकास महामंडळाच्या जंगलात झाले आहेत. त्यामुळे या महामंडळाचे अधिकारी वाघांचे संरक्षण करण्यात असमर्थ ठरत असल्याचे या आकडेवारीवरून सिध्द होते.

२०१२ मध्ये १० वाघ व १० बिबटय़ांचा मृत्यू झाला. चंद्रपूर वन विभागात एक वाघ व चार बिबटे, ब्रम्हपुरीमध्ये एक वाघ, चार बिबटे, मध्य चांदा वन विभागात प्रत्येकी एक वाघ व बिबटय़ा, तर २०१३ मध्ये दोन वाघ व चार बिबटय़ांचा मृत्यू झाला. २०१४ या वर्षांत तीन वाघ, तर आठ बिबटय़ांचे मृत्यू झाले. यामध्ये ताडोबा कोअर क्षेत्रात एक, बफरमध्ये एक आणि वन विकास महामंडळाच्या क्षेत्रात एक वाघ मृत पावला, तर चंद्रपूर वन विभागात तीन, ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रात दोन व मध्य चांदा वनपरिक्षेत्रात एक आणि ताडोबा बफर क्षेत्रात दोन बिबटय़ांचा मृत्यू झाला.

२०१५मध्ये १० वाघ तर आठ बिबटय़ांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये ब्रम्हपुरी वन विभागात तीन वाघ व एक बिबटय़ा, तर चंद्रपूर वन विभागात चार बिबटे, मध्य चांदा क्षेत्रात एक, ताडोबा कोअर क्षेत्रात एक वाघ, ताडोबा बफरम वनविकास महामहामंडळाच्या जंगलात वाघांचे संरक्षण योग्य पध्दतीने होत नसल्याची बाब समोर आली आहे. जंगलात वाघांची नोंद घेण्यात आली तरी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब स्पष्ट होते. वन विकास महामंडळाच्या अखत्यारीतील जंगलही वन विभागाला हस्तांतरित होत नाही तोवर ही समस्या कायम राहणार आहे.

जन्म व मृत्यू दरात तफावत

एकीकडे चंद्रपूर जिल्हय़ात गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या झपाटय़ाने वाढली म्हणून वन विभाग स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, मात्र चार वषार्ंत वाघ ज्या प्रमाणात वाढले त्याच प्रमाणात या जिल्हय़ात वाघांचे मृत्यूही झाल्याची बाब समोर आली आहे. २०१२ मध्ये ताडोबात ४९, २०१४ मध्ये ५१ व २०१४ मध्ये ७२ अशी वाघांची संख्या होती. बिबटय़ांची संख्या ३७ वरून थेट ४९ वर गेली आहे. ताडोबा बाहेरच्या जंगलात आज घडीला ५५ वाघ आहेत. यामध्ये चंद्रपूर वन विभागात १०, ब्रम्हपुरी ३३, मध्य चांदा १२ वाघ आणि १९० बिबटे आहेत. ही आकडेवारी बघितली तर गेल्या चार वषार्ंत २५ वाघ आणि ३० बिबटय़ांचे मृत्यू तुलनेने अधिक आहेत.