औरंगाबाद महानगरपालिकेतील शिवसेना-भाजपाची २७ वर्षांची युती तुटली

उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून महापौर नंदकुमार घडोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाने केली आहे.

संग्रहित छायाचित्र

गेल्या २७ वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिकेत अभेद्य असलेली शिवसेना-भाजपा युती आज अखेर संपुष्टात आली. औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेवरुन भाजपाने ही युती संपुष्टात आणली आहे. आमदार सावे यांनी युती तुटल्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपा आता महापालिकेत विरोधी बाकांवर बसणार आहे.

दरम्यान, भाजपाचे नगरसेवक उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून महापौर असलेले शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार घडोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाचे आमदार सावे यांनी केली असून युती तुटल्याचेही त्यांनी जाहीर केले.

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १६०० कोटी रुपयांच्या योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. तसेच राज्यात युती तुटली असताना औरंगाबादेत अद्याप युती कशी? अशी विचारणा लोक करीत असल्यामुळे उपमहापौर औताडे यांनी राजीनामा देत युती तुटल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे.

येत्या चार महिन्यांनंतर महापालिका निवडणूक होणार असल्याने भाजपाने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपा युतीतून बाहेर पडली असली तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असे महापौर घोडेले यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी निर्माण झाल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ही आघाडी पहायला मिळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 27 years alliance of shiv sena bjp in aurangabad municipal corporation is broken now aau

Next Story
बेगमपुऱ्यातील दस्तनोंदणी; महसूल यंत्रणाही सरसावली!
ताज्या बातम्या