हिंगोलीतील शेतकऱ्यांची दिवाळी, अतिवृष्टीग्रस्तांसाठी २९७ कोटी मंजूर

जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ९०३ शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. जिल्ह्यात जिरायतीचे २ लाख ९४ हजार २८३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

हिंगोली : जिल्ह्याला अतिवृष्टीतील नुकसानीपोटी २९७.२५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एसडीआरफच्या नियमानुसार २०२ कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना शासनाने वाढीव मदत मंजूर केल्याने त्यासाठीचे ९४ कोटी रुपये मिळणार आहेत. तूर्त यापैकी ७५ टक्के निधी वितरित करण्यात आला असल्याने अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ९०३ शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. जिल्ह्यात जिरायतीचे २ लाख ९४ हजार २८३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी एसडीआरफच्या धोरणानुसार २०० कोटी तर वाढीव दराने ९४.२७ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. आश्वासित सिंचनाखालील पिकांचे १ हजार ९०० शेतकऱ्यांचे १ हजार १८४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यात एसडीआरफच्या दरानुसार १.५९ कोटी तर वाढीव दराने १७.७६ लाखांची मदत मिळणार आहे. बहुवार्षिक पिकांचे ७७० शेतकऱ्यांचे ४८० हेक्टरचे नुकसान झाले. त्यात एसडीआरएफच्या दरानुसार ८६.३८ लाख तर वाढीव दराने ३३.५९ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

जिल्ह्यात एकूण ३ लाख ३१ हजार ५७३ शेतकऱ्यांचे २ लाख ९५ हजार ९४७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यात एसडीआरएफच्या दराने २०२.५७ कोटी रुपयांची मदत होणार आहे. यापैकी १५१.९३ कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने वितरित केली आहे तर वाढीव दराने जिल्ह्याला ९४.६८ कोटी मिळणार आहेत. यापैकी ७१ कोटी रुपये वितरित केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 297 crore sanctioned for hingoli farmers diwali heavy rains akp

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या