पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाटय़ाजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर मोटार आदळून झालेल्या अपघातात तीन जण ठार तर दोन जखमी झाले. जखमींवर लोणावळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री सातच्या सुमारास हा अपघात घडला.
नितीन सागर ठाणगे (वय ३२), जितेंद्र बाळाराम भोईर (वय ३०) आणि शैलेश शरद कुलकर्णी (वय ४०, सर्व जण रा. अंबरनाथ, मुंबई) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. संतोष यादव (वय २८) आणि संतोष भोईर (वय ३७, रा. मुंबई) हे दोघे जण जखमी झाले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकवीरा देवीदर्शनासाठी सर्व जण मुंबईहून आले होते. दर्शन घेऊन परत जात असताना कार्ला फाटय़ाजवळील पेट्रोलपंपाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर यांची मोटार जाऊन आदळली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2012 रोजी प्रकाशित
कार्ला फाटय़ाजवळ अपघातात तीन ठार; दोन जखमी
पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला फाटय़ाजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर मोटार आदळून झालेल्या अपघातात तीन जण ठार तर दोन जखमी झाले. जखमींवर लोणावळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री सातच्या सुमारास हा अपघात घडला.
First published on: 13-12-2012 at 04:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 killed 2 injured in accident near karla