scorecardresearch

रायगडमध्ये बस दरीत कोसळून ३ ठार, २९ जखमी

श्रीवर्धन मार्गावर घोणसे घाटात खासगी बस दरीत कोसळून रविवारी सकाळी भीषण अपघात झाला़ 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात माणगाव -श्रीवर्धन मार्गावर घोणसे घाटात खासगी बस दरीत कोसळून रविवारी सकाळी भीषण अपघात झाला़  त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर २९ प्रवासी जखमी झाल़े

नालासोपारा येथून ३२ प्रवाशांना घेऊन ही बस बोर्ली – श्रीवर्धनकडे निघाली होती. सकाळी पावणेआठच्या सुमारास घोणसे घाटात एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पुलाचा कठडा तोडून बस ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली.

या अपघातात अश्विनी बिरवाडकर (रा. धनगरमलई), मधुकर बिरवाडकर (रा. धनगरमलई) आणि सुशांत रिकामे, (रा़ वडघर पाचलोली) या तिघांचा मृत्यू झाला. अपघातात २९ जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली़  त्यांनी मदत व बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात नेल़े जखमींवर म्हसळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल़े  त्यातील १५ जणांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 3 killed 29 injured as bus falls into valley in raigad zws

ताज्या बातम्या