खालापूर तालुक्यातील सावरोलीस्थित के. डी. एल. बायोटेक कंपनीचे सरव्यवस्थापक (सुरक्षा व प्रशासन) दीपक धुमाळ यांनी आपल्या केबिनमधील बॅगमध्ये ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड अज्ञात व्यक्तीने ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान लंपास केली आहे, अशी फिर्याद खालापूर पोलीस स्टेशनमध्ये १९ नोव्हेंबर रोजी दाखल केली आहे. सरव्यवस्थापक धुमाळ यांनी कंपनीसाठी खरेदी केलेल्या वस्तूच्या बिलाची रक्कम अदा करण्यासाठी कंपनीच्या कॅशिअरकडून ४० हजार रुपये रक्कम ताब्यात घेतली होती. आपल्या बॅगेमध्ये पैसे ठेवून ती बॅग आपल्या केबिनमध्ये ठेवली होती. दरम्यान, वरिष्ठांनी बोलाविल्याचा निरोप आल्यामुळे धुमाळ केबिनमध्ये बॅग ठेवून त्वरित वरिष्ठांकडे गेले. वरिष्ठांच्या केबिनमधून धुमाळ आपल्या केबिनमध्ये आले तेव्हा केबिनमध्ये बॅग जागेवर होती, पण बॅगेतील ४० हजार रुपये गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कंपनीमध्ये सर्व स्तरावर चौकशी केल्यानंतर लंपास करण्यात आलेल्या रकमेचा शोध लागू शकला नाही. अखेर त्यांनी १९ नोव्हेंबरला खालापूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दाखल केली. पो. नि. दूरगुंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश म्हात्रे अधिक तपास करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2012 रोजी प्रकाशित
सरव्यवस्थापकाच्या केबिनमधील ४० हजारांची रोकड लंपास
खालापूर तालुक्यातील सावरोलीस्थित के. डी. एल. बायोटेक कंपनीचे सरव्यवस्थापक (सुरक्षा व प्रशासन) दीपक धुमाळ यांनी आपल्या केबिनमधील बॅगमध्ये ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड अज्ञात व्यक्तीने ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान लंपास केली आहे,
First published on: 22-11-2012 at 06:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 thousand cash robbed from general manager cabin