भरधाव वेगात टायर फुटल्याने मॅक्स गाडी उलटून पाच प्रवासी जागीच ठार झाले. मृतांमध्ये पोलीस जमादाराचाही समावेश आहे.
केज तालुक्यातील देवगाव फाटय़ाजवळ शनिवारी हा अपघात झाला. बीडहून केजकडे निघालेल्या मॅक्स (एमएच २४ एफ २६७२) गाडीचे टायर फुटल्याने गाडी उलटली गेली. या अपघातात गाडीतील पाच प्रवासी जागीच ठार झाले. मृतांमध्ये पोलीस जमादार इब्राहीम यांचाही समावेश आहे. उर्वरित चार मृतांची ओळख पटली नाही. अपघातात पाचजण जखमी झाले. त्यांच्यावर केज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पत्नी ठार, पिता-पुत्र जखमी
मालमोटारीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार, तर तिचा पती व ३ वर्षांचा मुलगा जखमी झाला.
बीड-मांजरसुंबा रस्त्यावर शुक्रवारी हा अपघात झाला. मोहसीन शेख हे रात्रीच्या वेळी दुचाकीवर (एमएच २३ जी ७७७) गावाकडे निघाले होते. हरियाणा ढाब्यासमोर मालमोटारीने (जीजे १० एक्स ८८५) धडक दिली. अपघातात शेख सीमा मोहसीन (वय २८) ही महिला जागीच ठार, तर शेख मोहसीन व शेख अलबक्ष हे पिता-पुत्र जखमी झाले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.