संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच विद्यार्थ्यांना या भाषेची गोडी लागावी, या हेतूने दादर येथील महर्षी व्यास प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येणारी ‘अमरकोश पाठांतर स्पर्धा’ पनवेल येथील वि. खं. विद्यालयात नुकतीच पार पडली. या स्पर्धेत पनवेल, ठाणे, नवी मुंबई येथील शाळांतील तब्बल ५७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  बालगटापासून इयत्ता दहावीपर्यंतच्या या गटवार स्पर्धेसाठी डीएव्ही पब्लिक स्कूल, महात्मा इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी, महात्मा स्कूल ऑफ अ‍ॅकॅडेमिक अँड स्पोर्ट्स, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, के. वि. कन्या विद्यालय, वि. खं. विद्यालय, चांगू काना ठाकूर विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. सई कुलकर्णी, अंजली गोडबोले, श्रीराम वत्सराज, माया कदम, सुमुख नाईक, तृप्ती सोनवणे, स्मिता आपटे, श्रेयसी कर्वे, शंकर गोडसे, संध्या जाधव, प्रसाद जोशी, मनीषा शेवडे, ऋता परांजपे, स्मिता हर्डिकर यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली तर दिव्या देवळेकर, नीकिता जोशी, नेहा दातार, अपूर्वा गोखले, जागृती पवार आणि सुनंदा लखपती यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेले इच्छुक विद्यार्थी दादर केंद्रावर राजा शिवाजी विद्यालय येथे २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, अशी माहिती प्रतिष्ठानच्या कार्यवाह तरंगिणी खोत यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 570 student will participate in amarkosh memorise compitition
First published on: 19-12-2012 at 07:09 IST