scorecardresearch

हिंगोलीत ट्रक – जीपच्या धडकेत सहा ठार

हिंगोलीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या कलगाव फाट्यावर शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघातात झाला.

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. नागपूर येथील डीआरडीओच्या यूनिटमधून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटला अटक केली आहे.

हिंगोलीत भरधाव ट्रकने जीपला धडक दिली असून या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून जखमींवर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंगोलीपासून आठ किलोमीटरवर असलेल्या कलगाव फाट्यावर शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघातात झाला. भरधाव ट्रकने जीपला धडक दिली असून या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृत व जखमी हे वाशिम जिल्ह्यातील आडगाव व सुरवाडी येथील रहिवासी आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 6 killed in truck jeep collision in hingoli

ताज्या बातम्या