सामान्यांचा घरसंसार दरमहा सहाशे रुपयांमध्ये चालू शकतो असा शोध दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी लावल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापूरच्या रविकांत पाटील युवा मंचने शीला दीक्षित यांना सहाशे रुपयांची मनी ऑर्डर करून या रकमेत महिन्याचा संसार कसा चालू शकतो, हे कळविण्याचे आवाहन केले आहे.
मंचचे अध्यक्ष जयराज नागणसुरे यांनी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना त्यांच्या दिल्लीच्या निवास पत्त्यावर सहाशे रुपयांची मनी ऑर्डर केली आहे. अन्न योजनेंतर्गत दिल्ली शासनाने गरीब कुटुंबीयांसाठी रेशनधान्याकरिता दर महिना सहाशे रुपयांची योजना घोषित केली आहे. यासंदर्भात शीला दीक्षित यांनी सामान्य कुटुंबीयांचा संसार दरमहा सहाशे रुपयांत चालू शकतो, असे वादग्रस्त विधान केले होते. त्याचा निषेध म्हणून रविकांत पाटील युवा मंचने सहाशे रुपयांची मनी ऑर्डर पाठवून गरिबांनी दरमहा सहाशे रुपयांत संसार कसा करावा याचे गणित सोडवून देण्याचे आवाहन केले आहे. शीला दीक्षित यांनी स्वत:चा संसार चालून दाखवावा व नंतर झालेल्या खर्चाचा हिशोब आम्हास पाठवावा, असे आवाहन करण्यात आले
आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2012 रोजी प्रकाशित
शीला दीक्षित यांना सोलापुरातून सहाशेची मनी ऑर्डर!
सामान्यांचा घरसंसार दरमहा सहाशे रुपयांमध्ये चालू शकतो असा शोध दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी लावल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापूरच्या रविकांत पाटील युवा मंचने शीला दीक्षित यांना सहाशे रुपयांची मनी ऑर्डर करून या रकमेत महिन्याचा संसार कसा चालू शकतो, हे कळविण्याचे आवाहन केले आहे.
First published on: 24-12-2012 at 01:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 600 rupees money order sent to sheila dixit