रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मॅरेथॉन कमिटी यांच्यातर्फे रविवार १३ जानेवारी रोजी ‘खारघर मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले असून एकूण सहा लाख रुपयांची बक्षिसे हे या शर्यतीचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. गेली सहा वर्षे होणाऱ्या या शर्यतीचे प्रथमच खारघरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलपासून सकाळी ७.०० वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधात एक धाव’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन एकूण १३ गटांत होणार आहे. यात २१ किमी पुरुष खुला गट, ११ किमी महिला खुला गट, ११ किमी १९ वर्षांखालील मुलांचा गट आदी गटांचा प्रामुख्याने समावेश आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसाठीही एक विशेष गट ठेवण्यात आला आहे. या मॅरेथॉनला दरवर्षी हजारो स्पर्धकांचा प्रतिसाद लाभतो. यंदा त्यापेक्षाही अधिक प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
खारघर मॅरेथॉनमध्ये सहा लाखांची बक्षिसे!
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मॅरेथॉन कमिटी यांच्यातर्फे रविवार १३ जानेवारी रोजी ‘खारघर मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले असून एकूण सहा लाख रुपयांची बक्षिसे हे या शर्यतीचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. गेली सहा वर्षे होणाऱ्या या शर्यतीचे प्रथमच खारघरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 11-01-2013 at 06:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6lakhs prizes in kharghar marathon