खाद्यतेलाची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक खंबाटकी घाटात पलटी

हा मालवाहतूक करणारा ट्रक पुण्याहून साताऱ्याकडे जात होता, अशी माहिती मिळतीए.

truck
खाद्यतेलाची वाहतूक करणारा मालट्रक खंबाटकी घाटात पलटी

साताऱ्यात पुणे-बंगळूरू महामार्गावर मध्यरात्री ट्रक पलटी झाला. खाद्यतेलाची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक मध्यरात्री खंबाटकी घाटात पलटला. अपघातानंतर घाटात आणि रस्त्यावर खाद्यतेलाच्या पिशव्यांचा खच पसरला होता. हा मालवाहतूक करणारा ट्रक पुण्याहून साताऱ्याकडे जात होता, अशी माहिती मिळतीए.

अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र खाद्य तेलाचे आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रकमध्ये असलेल्या तेलाच्या पिशव्या फुटल्या असून घटनास्थळी तेल रस्त्यावर पसरलं होतं. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांना लगेच घटनास्थळी धाव घेतली. घाट असल्याने तेलामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी ट्रकसह तेलाच्या पिशव्या हटवल्या.  ट्रकदेखील घटनास्थळावरून हटवण्यात आला असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A truck carrying edible oil overturned in khambhatki ghat satara hrc