आदित्य ठाकरेंना कोकणात पाय ठेऊ देणार नाही अशी गर्जना करत स्वाभिमानी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिले होते.  यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे शनिवारी सिंधुदुर्ग दौ-यावर आले आहेत. यावेळी आदित्य यांनी नितेशना चांगलाच टोला लावला.
धमकी देणा-यांना आम्ही माफ करतो. पण शिवसैनिकांना हात लावाल तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्वाभिमानी संघटनेचे नितेश राणेंना दिला आहे. धमकी देणा-या नेत्यांनी धमकी देण्याऐवजी धमक्या देण्याऐवजी विकासाच्या मुद्यावर चर्चेला यावे. मला शिव्या दिलात तरी चालेल, पण जर शिवसैनिकांना काही बोललात तर याद राखा.