शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी चर्चेचा आणि राजकीय वर्तुळासाठी उत्सुकतेचा विषय असतो. या मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख नेमकी काय भूमिका मांडणार आणि कुणावर हल्लाबोल करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. यंदा मात्र दसरा मेळावा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यावेळी नेमका दसरा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा होणार की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा होणार? यावरून बरीच चर्चा सुरू आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमानुसार जे योग्य असेल, ते केलं जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावरून शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. मात्र, या मेळाव्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून त्यासंदर्भात नियमात जे असेल, त्यानुसार कार्यवाही केली जाईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली आहे. मात्र, आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार की शिवसेनेला परवानगी मिळणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
bharat gogawale, sunil Tatkare
रायगडमध्ये तटकरे – गोगावले यांच्यात दिलजमाई
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

संभाजी ब्रिगेडने..”, शिंदे गटाकडून राष्ट्रवादीचा उल्लेख करत शिवसेनेवर आगपाखड!

आदित्य ठाकरे म्हणतात, “हे गद्दार…”

यासंदर्भात नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर आगपाखड केली आहे. दसरा मेळावा शिवसेनेचाच असतो आणि शिवसेनेचाच राहणार, असं ठामपणे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. “आम्ही परवानगीसाठी सतत प्रयत्न करत आहोत. पण गद्दार सरकार दडपशाहीचं धोरण अवलंबत आहे. या सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. पण शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होतो ही प्रथा आहे. जनता देखील बघत आहे. अनेक वर्ष महाराष्ट्राची राजकीय परंपरा मोडून ही गद्दारी झाली आहे. हीच गद्दारीची प्रथा हे गद्दार खोके सरकार पुढे नेत आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

यंदाचा शिवसेना दसरा मेळावा कोणाचा? उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेचा? परवानगीबद्दल फडणवीस स्पष्टच म्हणाले, “गृहमंत्री म्हणून…”

“हा शिवसेनेचा विषय आहे. शिवसेना शिवतीर्थावर नेहमीच दसरा मेळावा करत आली आहे. खोके सरकार किती दिवस टिकेल, हे काही दिवसांतच आपल्याला कळेल. आम्ही परवानगीसाठीचा अर्ज द्यायला जात आहोत. पण तिथे कुणी त्याचा स्वीकार करत नाहीये. हे सरकार दडपशाहीचं सरकार बनू लागलंय”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.