उबेदूर रहेमानने मालेगावच्या अल अजीज जीम यांच्या पुढाकाराने व नाशिक बॉडीबिल्डिंग अँण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या पहिल्या ‘अब्दुल अजीज २०१३’ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. मोस्ट इम्प्रूव्हड शरीरसौष्ठव म्हणून जाहिद अहमद तर बेस्ट पोझर म्हणून इकबाल अहमद यांना गौरविण्यात आले. प्रारंभी गटवार स्पर्धा झाल्या. ५५ किलो गटात शफीक अहमद, ६० किलो गटात जाहिद अहमद, ६५ किलो गटात मोहंमद जाकीर, ७० किलो गटात उबेदूर रहेमान आणि ७५ किलो गटात इक्बाल अहमद यांनी विजेतेपद मिळविले. यानंतर अंतिम फेरीत उबेदूर रहेमानच्या बाजूने पंचांनी कौल दिला. गटवार विजयी स्पर्धकांना प्रमुख पाहुणे हाजी शेख खलीद, राजुरी स्टीलचे संजय कलंत्री, शेख कलीम शेख दिलावर, सलीम अनवर आदींच्या हस्ते रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे मुख्य आकर्षण राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू महेंद्र पगडे हा ठरला. त्याने उत्कृष्ट प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन राजेंद्र सातपूरकर यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2013 रोजी प्रकाशित
उबेदूर रहेमान ‘अब्दुल अजीज २०१३’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी
उबेदूर रहेमानने मालेगावच्या अल अजीज जीम यांच्या पुढाकाराने व नाशिक बॉडीबिल्डिंग अँण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या पहिल्या ‘अब्दुल अजीज २०१३’ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
First published on: 25-02-2013 at 03:24 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdur rehman won abdul ajij 2013 body building compitition