मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घोटीजवळील सिन्नर चौफुलीवर चार वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात १८ जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.
सिन्नर चौफुलीवर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या मालमोटारीने अचानक वेग कमी केल्याने पाठीमागून येणारा दुसरा टेम्पो उलटलाा. यामुळे टँकरमधील रसायनाची गळती सुरू झाली.
याचवेळी समोरून येणाराही टँकर उलटला. नाशिकहून इगतपुरीकडे जाणाऱ्या कारलाही धडक बसली. या अपघातातील गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले.  
रसायनांच्या गळतीमुळे वाहतूक वळविली
इतर जखमींवर घोटीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात नुकसान झालेल्या एका वाहनातून रसायनाची गळती होऊ लागल्याने प्रसंगावधान म्हणून या मार्गावरील वाहतूक काळी काळ दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.