ठाकरे गटातील नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी खुले आव्हान दिले होते. मी वरळी मतदारसंघातून राजीनामा देतो. एकनाथ शिंदे यांनी माझ्या विरोधात लढून दाखवावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. शिंदे गटातील नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर कठोर शब्दांत टीका केला. दरम्यान, आता आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. मुख्यमंत्री घाबरले आहेत. त्याना वरळीतून लढायचे नसेल तर मी त्यांनी आमदारकी आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मी ठाण्यातून लढतो, असे दुसरे आव्हान आदित्य ठाकरेंनी केले आहे. ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

हेही वाचा >>> शिवाजी महाराजांवरील विधानावर ठाम, मग पक्षाचा पाठिंबा का नाही? आव्हाड यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले “मी एका…”

ते माझ्या आव्हानाला घाबरले आहेत

“तुम्ही ४० आमदार पळवले १३ खासदार पळवले. त्यांच्यासोबत एवढी मोठी शक्ती आहे. मी त्यांना एक सोपं चॅलेंज दिलेले आहे. केंद्र सरकार आणा, तुमची यंत्रणा आहे. मी तुम्हाला आत टाकू शकत नाही. माझ्याविरोधात उभे राहून दाखवा आणि जिंकून दाखवा. एवढं सोपं चॅलेंज आहे. मात्र त्यांची हिंमत झाली नाही. केंद्रिय नेत्यांपासून ते गल्लीतल्या नेंत्यापर्यंत मला शिव्या दिल्या जात आहेत. त्यांनी एवढं सारं केलं मात्र मुख्यमंत्री काही बोलत नाहीयेत. ते काही उत्तर देत नाहीयेत. यावरून मी एवढंच समजतो की ते माझ्या आव्हानाला घाबरलेले आहेत,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

हेही वाचा >>> विरोधकांच्या टीकेनंतर आव्हाड आक्रमक, म्हणाले “तुरुंग काढून वीर सावरकरांना…”

ठाण्यात मी तुमच्यासमोर लढायला येतो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी त्यांना एकच सांगतो की आयटी सेल चालवण्यापेक्षा, एवढं सारं करण्यापेक्षा मला स्वत: फोन फोन करून आदित्य तू मला दिलेलं आव्हान मला परवडणारं नाही. मला जमत नाही. मी वरळीतून लढू शकत नाही, एवढेच सांगायला हवे होते. नंतर मी त्यांना दुसरे चॅलेंज दिले असते, की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्या, आमदाराकीचा राजीनामा द्या. ठाण्यात मी तुमच्यासमोर लढायला येतो. तिथे एकदा होऊन जाऊद्या. मग बघू या महाराष्ट्रात काय होतं,” असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.