महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची रायगड जिल्हा समन्वय समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या सभेत समन्वय समितीचे पुनर्गठन करण्यात आले. यामध्ये रायगड जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) प्रकाश खोपकर यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, सरचिटणीस म्हणून पंचायत समिती उरणचे पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. जी. जाधव, उपाध्यक्ष म्हणून उपअधीक्षक भूमी अभिलेख पनवेल सिद्धेश्वर घुले, चौकचे पशुधन विकास अधिकारी डॉ. बळीराम इनकर, प्राथमिक आरोग्य केंद्र लोहपचे डॉ. आर. जी. राठोड, अलिबागचे तहसीलदार प्रकाश सपकाळ, जिल्हा कोषागार अधिकारी प्रकाश गावडे, कृषी विभागाचे उपसंचालक राजाराम मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विडेकर, पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. बी. भोये यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी आर. टी. लाकुडझोडे, सहसचिव म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल आहेर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी, रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांची निवड करण्यात आली. महिला प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी दीपाली यादव व मुरुड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वंदना गुळवे यांनी निवड करण्यात आली. समन्वय अधिकारी म्हणून तहसीलदार जयराम देशमुख यांची तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदेकर यांची निवड करण्यात आली. या वेळी सरचिटणीस डॉ. डी. जी. जाधव यांनी महासंघाच्या राज्यस्तरीय मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली. शेवटी अध्यक्ष प्रकाश खोपकर यांनी सर्वाचे आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2015 रोजी प्रकाशित
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची रायगड समन्वय समिती गठित
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची रायगड जिल्हा समन्वय समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
First published on: 20-06-2015 at 07:36 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administrative officers meeting at raigad