जिल्ह्यातील सर्व गावे दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समाविष्ट करून सरसकट सर्वच शेतकऱ्यांना योग्य आíथक मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी माजी पालकमंत्री मधुकर चव्हाण व जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तत्पूर्वी शहरातील मुख्य मार्गावरून या नेत्यांनी पदयात्रा काढली.
राज्य सरकारने जिल्ह्यात दुष्काळग्रस्तांना तुटपुंजी मदत देऊन टीका ओढवून घेतली. गेल्या ४ वर्षांपासून आíथक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य मदत मिळणे अपेक्षित होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिरायत क्षेत्राच्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे, बागायतीस ५० हजार रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी किमान १ लाख रुपये मदत देणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांचे वीजबिल व कर्ज माफ करावे, मजुरांना कामे उपलब्ध करून रोजगारनिर्मिती करावी, ऊसउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन तीन हजार रुपये दर द्यावा, खादी ग्रामोद्योगासाठी दिलेले कर्ज माफ करण्यात आले. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही, याकडे लक्ष देऊन ते कर्ज माफ करावे, दुधाला प्रतिलिटर ३० रुपये दर द्यावा, पुढील खरीप हंगामात पेरणीसाठी बी-बियाणे, खते शेतकऱ्यांना मोफत द्यावीत आदी मागण्यांसाठी आमदार चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन केले.
मुख्य रस्त्यांवरून पदाधिकारी व शेतकऱ्यांनी पदयात्रा काढून मागण्यांबाबत घोषणा दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जि. प. अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, काँग्रेस जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, सुभाषसिंह सद्दीवाल, विलास शाळू, लक्ष्मण सरडे, दत्तात्रय सोनटक्के आदी पदाधिकारी, कार्यकत्रे व शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.