अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात आज एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. जिल्हा रुग्णालयास भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला. तर, अन्य काहीजण जखमी देखील झाले आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्याची घटना घडली. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते आणि हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, या घटनेची चौकशी करण्यासाठी आता चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग; १० रुग्णांचा मृत्यू

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना याबात माहिती देताना सांगितले की, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेबाबत विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही दुर्दैवी घटना आहे. सरकारने पुन्हा फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही अशा घटना घडणे दुर्दैवीच आहेत. असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

Ahmednagar District Hospital fire : मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश ; दोषींवर कठोर कारवाई होणार!

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून, तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.