scorecardresearch

Premium

“१५ दिवसांत सावत्र भावासारखे वागायला लागलात”, निधीवाटपावरून अजित पवार-यशोमती ठाकूर यांच्यात कलगीतुरा!

विधानसभेत निधी वाटपावरून अजित पवार आणि यशोमती ठाकूर यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

ajit pawar and yashomati thakur
अजित पवार आणि यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अर्थमंत्री म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. शिंदे गट आणि भाजपाच्याही आमदारांना मुबलक निधी दिला आहे. पण विरोधी पक्षातील आमदारांना निधी देताना दुजाभाव केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही निधी वाटपावरून सरकारवर आरोप केले होते. या आरोपांना अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत उत्तर दिलं. या उत्तरानंतर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आणि अजित पवार यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला.

निधी वाटपावरून केलेल्या आरोपांवर अजित पवार विधानसभेत म्हणाले, “बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की, सत्ताधारी पक्षातील आमदारांना निधी दिला जातो आणि विरोधी पक्षातील नेत्यांना निधी दिला जात नाही. पण २०१९, २०२० आणि २०२१ या काळात निधीवाटपाबद्दल जे साधारण सूत्र होतं. तेच सूत्र आम्ही पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये फारसा काही बदल केला नाही.” अजित पवारांच्या या उत्तरावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर जोरदार आक्षेप नोंदवला.

sharad pawar slams dilip walse patil in ambegaon
‘वडिलांच्या तुलनेत पाच टक्केही निष्ठा नाही’, शरद पवारांची दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका
rain in Kailash Khers program the audience flees by covering chairs as umbrellas
वर्धा : कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात पावसाचे आगमन, खुर्च्यांची छत्री करीत श्रोत्यांचे पलायन; पाच हजार खुर्च्या गायब
conflict between two factions of shiv sena during ambadas danve kolhapur visit
कोल्हापूर: अंबादास दानवे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेनेतील दोन गटातील संघर्ष शिगेला
Ganpat Gaikwad arrested
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अटक, शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारवाई

हेही वाचा- “खेकड्यांना सांभाळलं असतं तर…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा टोला

यावर अजित पवार पुढे म्हणाले, “यशोमतीताई, तुम्ही माझ्या भगिनींसारख्या आहात. माझं ऐकून घ्या. माझं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. राज्यात ज्यावेळी कृषी महाविद्यालयं मंजूर करायची होती. त्यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचंही कृषी महाविद्यालय होतं. याला धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्य यांची परवानगी घेऊन मंजुरी दिली आहे. आम्ही भेदभाव केला नाही.”

हेही वाचा- “महिलांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जातायत, त्यांच्यावर बलात्कार…”, मणिपूर हिंसाचारावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या “तुम्ही १५ दिवसांतच सावत्र भावासारखं वागायला लागलात.” यशोमती ठाकूर यांना उद्देशून अजित पवार पुढे म्हणाले, “भावाच्या नात्याने ओवाळणी देतो. काळजी करू नका. तुम्ही चष्मा बदला, सावत्र भावाप्रमाणे माझ्याकडे बघू नका. मी सावत्र बहीण म्हणून तुमच्याकडे बघत नाही.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar and yashomati thakur clashes in vidhansabha on fund distribution rmm

First published on: 25-07-2023 at 18:14 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×