Maharashtra Dy CM Ajit Pawar Diagnosed With Dengue : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत. अजित पवारांनी त्यांचे अनेक नियोजित कार्यक्रमही रद्द केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अशातच अजित पवारांचे सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील गैरहजेरीबद्दल मोठी माहिती दिली आहे. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून दिली आहे.

अजित पावारांची काल आरोग्य तपासणी करण्यात आली. यातून अजित पवारांना डेंग्यू झाल्याचं निदान झालं आहे. पुढील काही दिवस अजित पवारांवर वैद्यकीय उपचार केले जातील. तसेच त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणार नाहीत.

Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Ajit Pawar, Raj Thackeray,
राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Vijay Wadettiwar
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?

प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नसल्याबद्दल प्रसारमाध्यमांवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या पाहता मी स्पष्ट करू इच्छितो की, अजित पवारांना कालच डेंग्यू झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे. पुढचे काही दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्यांना वैद्यकीय उपचार आणि विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पटेल यांनी म्हटलं आहे की, अजित पवार हे जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहेत. ते पूर्णपणे बरे झाल्यावर त्यांचं काम सुरू करतील. बरे झाल्यानंतर ते त्यांची लोकांप्रती असलेली सार्वजनिक कर्तव्ये पूर्ण शक्तीने पार पाडतील.

हे ही वाचा >> “ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं”, फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊत संतप्त होत म्हणाले, “तुमची कारस्थानं…”

पावसाळा संपल्यानंतर अनेक ठिकाणी साचलेले पाणी तसेच राहते. यामुळे डास आणि घाणीचा प्रादुर्भाव वढतो. अशा परिस्थितीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. या महिन्यांमध्ये डेंग्यू या आजाराचा धोका सर्वाधिक धोका असतो. एडिस डासाची मादी चावण्याने हा रोग होतो. या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. डेंग्यू झाल्यावर रुग्णाला ताप येणे, डोळे दुखणे, अंगदुखी, भूक न लागणे, उलटी होणे अशी लक्षणे दिसतात.