विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार तथा काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी शनिवारी (४ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. मला चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला. तांबे कुटुंब तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठी हा कट रचण्यात आला. आमच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले, असे गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केले. तांबे यांच्या या आरोपानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाच विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विरिष्ठ नेते अजित पवार यांनी आमची चूक झाली, सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असे विधान केल्याचे समोर आले आहे. ते बारामतीमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.

हेही वाचा >> कथित हेरगिरी करणाऱ्या चीनच्या ‘बलून’ला हवेतच केले नष्ट, कारवाईसाठी अमेरिकेची विशेष मोहीम!

“शिकलेल्या पदवीधरांनी आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण पाहिलेच आहे. सध्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल हा सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. फोडाफोडीचं राकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. मात्र सध्या जो शिकलेला मतदार आहे, त्याने कशा प्रकारचा कौल दिला आहे, हे आपण पाहिले,” असे अजित पवार म्हणाले.

फोडाफोडीचं राकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही

“शिकलेल्या पदवीधरांनी आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण पाहिलेच आहे. सध्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल हा सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. फोडाफोडीचं राकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. मात्र सध्या जो शिकलेला मतदार आहे, त्याने कशा प्रकारचा कौल दिला आहे, हे आपण पाहिले,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> “देशपातळीवर राहुल गांधींचं भारत जोडो, नी राज्यात मात्र…” सत्यजित तांबेंचा प्रदेश काँग्रेसवर घणाघात

तरुण चांगेल काम करत असतील तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमची जरा चूक झाली. मी त्याचा अगोदरच उल्लेख केला आहे. नाशीक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती. वडील काय किंवा मुलगा काय. तरुणांना संधी दिली पाहिजे. तरुण चांगेल काम करत असतील तर त्यांना संधी द्यायला हवी, या मताचा मी आहे. मात्र कोणाला उमेदवारी द्यावी, हा सर्वस्वी काँग्रेसचा अधिकार होता. त्यात मी लुडबूड करण्याचे काही कारण नव्हते. कारण ती जागा काँग्रेसला सुलटलेली होती,” असेही अजित पवार म्हणाले.