महाड हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक येथे आहे. माणिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड नगरपालिकेची विकासाच्या कामांचा जो धडाका पाहिला त्यावरून त्यांच्या कामाची पावती मिळते.
जगताप यांचे भवितव्य उज्ज्वल असून या शहराच्या विकासासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज दिले.
महाड नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचा शुभारंभ उद्घाटन सोहळा व अपंग कल्याण योजनेंतर्गत लाभार्थीना साहित्य वाटप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. चवदार तळे येथील डॉ. आंबेडकर सभागृहात पालिकेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस माणिकराव जगताप, नगराध्यक्षा श्रीमती नूपुर जोशी, उपनगराध्यक्ष रमेश वैष्णव आदी मान्यवर उपस्थित होते. या शहरातील विकासाच्या कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. एकाच दिवशी कोटय़वधी कामे सुरू करताना शासनाकडून जगताप यांनी जो निधी मंजूर करून आणला त्याचे थोरात यांनी कौतुक केले.
उद्घाटन कार्यक्रमाला उशीर झाल्याने शहरातील प्रमुख कामांचा शुभारंभ मंत्री महोदय आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये यशवंत हॉस्पिटल ते शेडाव नाका जोडरस्त्याचे मजबुजीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन, कै. अॅड. सुधारकर सावंत मार्ग ते शासकीय तांत्रिक विद्यालयपर्यंतच्या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन, दलित वस्ती सुधारणा व पाणीपुरवठा योजनेंतर्गत भीमनगर येथे उंच साठवण टाकी बांधणे आणि ऊध्र्व वाहिनी व वितरण व्यवस्था करण्याच्या कामाचा शुभारंभ इत्यादी महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.
नगरपालिकेच्या विकासकामांचा शुभारंभ समारंभानंतर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यांतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2013 रोजी प्रकाशित
महाड शहराच्या विकासासाठी सर्व प्र्रकारे सहकार्य करणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
महाड हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक येथे आहे. माणिकराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड नगरपालिकेची विकासाच्या कामांचा जो धडाका पाहिला त्यावरून त्यांच्या कामाची पावती मिळते.
First published on: 06-02-2013 at 04:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All type of co opration will give to development of mahad city thorat