आदित्य डेंटल महाविद्यालयात तक्रार करणाऱ्या मुलींना संचालकांनी डांबून ठेवल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच गुरुवारी सकाळीच महाविद्यालयाकडे शिवसेना, मनसे व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. विद्यार्थिनींनी संस्थाचालकांकडून होत असलेली दमदाटी आणि गैरसोयीबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडून इतर ठिकाणी प्रवेश घेण्यास महाविद्यालयाने स्थलांतर पत्र व इतर कागदपत्रे देण्याची मागणी केली. प्रशासनाने पोलिसांना बोलविल्याने महाविद्यालयात एकच गोंधळ उडाला. अखेर महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे प्रवेश शुल्क व कागदपत्रे देण्याची तयारी दर्शवली. या मुलींनी जिल्हाधिकारी व पोलिसांकडे महाविद्यालयाच्या संचालिका आदिती सारडा या दमदाटी करत असल्याची तक्रार केली.येथील काँग्रेसचे नेते व्यावसायिक सुभाष सारडा यांचे परळी रस्त्यावर आदित्य इंजिनिअरिंग व दंत महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या बहुतांश मुली या इतर जिल्ह्य़ातील आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
‘आदित्य डेंटल’च्या विद्यार्थिनींचे आंदोलन
आदित्य डेंटल महाविद्यालयात तक्रार करणाऱ्या मुलींना संचालकांनी डांबून ठेवल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच गुरुवारी सकाळीच महाविद्यालयाकडे शिवसेना, मनसे व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. विद्यार्थिनींनी संस्थाचालकांकडून होत असलेली दमदाटी आणि गैरसोयीबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडून इतर ठिकाणी प्रवेश
First published on: 11-01-2013 at 06:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andolan from aaditya dentel student