वाडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी (१६ जानेवारी) आयोजित केलेल्या बैठकीमध्ये तालुक्यात कार्यरत असलेल्या अन्य दोन पत्रकार संघाचे वाडा तालुका पत्रकार संघात विलीनीकरण करून सर्वानुमते अशोक पाटील यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र थोरात, श्रीकांत भोईर व दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सभेत तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आपल्या पत्रकार संघाचे स्वतंत्र अस्तित्व न ठेवता सर्वानी संघटित होऊन एकत्र आल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, या प्रस्तावास सर्व पत्रकारांनी पाठिंबा दर्शविल्याने गेली २५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले अशोक पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणी याप्रमाणे उपाध्यक्ष रमेश पाटील, दिलीप पाटील, सचिव वैभव पालवे, कार्याध्यक्ष युवराज ठाकरे, सहसचिव रुपेश मोकाशी, कृणाल साळवी, खजिनदार राम जाधव, संपर्कप्रमुख जयेश शेलार, सल्लागार राजेंद्र थोरात, श्रीकांत भोईर, दीपक साळुंखे तसेच सदस्य म्हणून वसंत भोईर, अनंता दुबेले, विनोद पाटील, मच्छिंद्र अगिवले, संदेश पाटील, संतोष पाटील, समीर म्हात्रे, निखिल भानुशाली, शशिकांत कासार, दिनेश यादव, संजय लांडगे, विजय गायकवाड व संजय जाधव यांची निवड करण्यात आली.