शहरातील सातपूर-अंबड लिंक रोडवर राहणाऱ्या विधवेच्या तक्रारीवर योग्य वेळेत कारवाई न केल्याने तिला आत्महत्या स्वीकारावी लागल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांना जबाबदार धरून पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी निलंबित केले.  
सातपूर-अंबड लिंक रोडवरील भीमाशंकर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या निर्मला शिंदे यांना दोन महिन्यापासून परिसरातील राजेश आहेर ही व्यक्ती त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून त्यांनी दोन जानेवारी रोजी सातपूर पोलिसात संशयिताविरूध्द तक्रार अर्ज केला होता.