वारकरी संप्रदायात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माघी एकादशीला राज्यातून जवळपास तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. करोनाच्या पार्शवभूमीवर या वारीला प्रशासनाने आरोग्याच्या सोयी सुविधांसह व्यवस्था केली आहे. एकादशी निमित्त हरी विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी तर रुक्मिणीमातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
गेल्या दोन वर्षात करोनामुळे सहा वारीवर निर्बंध लागू होते. मात्र, करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने कार्तिकी यात्रा भरली. मात्र त्यानंतर राज्यात करोना बाबतचे अनेक नियम शिथिल केले. त्यामुळे माघी वारीसाठी प्रशासनाने सोयी सुविधा बरोबर आरोग्य सेवा देखील पुरविण्यात आली आहे. मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना चहा,पाणी,फराळ तसेच आरोग्य सेवा मोफत पुरविल्या आहेत. त्याच बरोबर दर्शन रांगेतील भाविकांनी मास्क, सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.
देवाचे मुख दर्शन सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. माघी वारीला चंद्रभागा स्नानाला महत्व आहे. त्यादृष्टीने चंद्रभागा नदीपात्रात बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, एकादशी निमित्त पहाटे श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशात्री भगरे गुरुजी दाम्पत्याच्या हस्ते तर रुक्मिणीमातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव दाम्पत्याने केली. तसेच यावेळी मंदिर सिटीच्या दिनदर्शिकेचे व डायरीचे प्रकाशन मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आली.
तसेच एकादशी निमित्त पुण्यातील भाविक सचिन अण्णा चव्हाण संदीप पोकळे आणि युवराज सोनार यांनी फुलाच्या आरास केली. या कामी झेंडू,शेवंती जरबेरा आदी १ टन फुलांची आरास करण्यात आली. या फुलांच्या आरसा मुले देवाचे रूप अधिकच खुलून दिसून आले. एकादशी निमित्त भाविकांनी चंद्रभागा स्नान ,नगरप्रदक्षिणा करून देवाचे दर्शन घेतले. एकादशी निमित्त म्हणजे आज दुपारी साडे अकरा वाजता दर्शन रांग पत्राशेड पुढे पोहचली होती. दर्शन रांगेतून देवाचे मुख दर्सनासाठी साधारपणे सात तास वेळ लागत आहे. दरम्यान, शहरातील धर्मशाळा ,मठ , मंदिर परिसर येथे भाविकांची गर्दी आणि टाळ मृदूंगाच्या जयघोषाने पांढरी नगरी दुमदुमून निघाली आहे.