वेळेवर प्रचार खर्चाचा तपशील न कळविणाऱ्या २२ जणांना निवडणूक निरीक्षकांनी नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. काही उमेदवार दररोज निवडणूक खर्च दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. या खर्चाची तपासणी लवकरच केली जाणार आहे.
शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आतापर्यंत ३ लाख ४४ हजार ५१० रुपयांचा खर्च केल्याचा तपशील दिला आहे. नितीन पाटील यांनी २ लाख ४६ हजार ३५८ तर आम आदमी पार्टीचे सुभाष लोमटे यांनी १ लाख ४१ हजार ५८० रुपये प्रचारावर खर्च झाल्याचे कळविले आहे. निवडणूक प्रचार कालावधीत दोन वेळा निवडणूक निरीक्षकांकडून खर्चाची तपासणी होते. १५ व १६ एप्रिल रोजी तपासणी केली जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर २२ उमेदवारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2014 रोजी प्रकाशित
औरंगाबादच्या २२ उमेदवारांना नोटिसा!
वेळेवर प्रचार खर्चाचा तपशील न कळविणाऱ्या २२ जणांना निवडणूक निरीक्षकांनी नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. काही उमेदवार दररोज निवडणूक खर्च दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. या खर्चाची तपासणी लवकरच केली जाणार आहे.
First published on: 14-04-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad 22 candidates notice