दिवाळीच्या मंगलमय पर्वात हजारो भाविकांच्या उपस्थितीत तुळजापूरची परंपरागत काळभरवाची भेंडोळी
पार पडली. शेकडो मानकरी युवकांनी पेटलेली भेंडोळी खांद्यावर घेत केलेल्या काळभरव-टोळभरवाच्या जयघोषाने तुळजाभवानी मंदिर परिसर दणाणून गेला. सुमारे दहा फुटांच्या पेटत्या ज्वाला अंगावर घेऊन निघालेली भेंडोळी केवळ काशी व तुळजापूर या दोनच क्षेत्रांत काढली जाते.
दिवाळी पाडव्यानिमित्त तुळजाभवानी मंदिरात काळभरवाची भेंडोळी उत्साहात निघाली. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता काळोबाच्या कडय़ावरून शेकडो भाविकांनी भेंडोळी खांद्यावर घेतली व शिवाजी दरवाज्याच्या दोन फुटांच्या अरुंद बोळातून देवीच्या गाभाऱ्यात आणण्यात आली. महंत मावजीनाथ बुआ यांनी भेंडोळीला हजेरी लावली. तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, रावसाहेब िशदे यांची उपस्थिती होती.
तुळजाभवानीचे दर्शन घेऊन भेंडोळी िनबाळकर दरवाज्यातून राजे शहाजी महाद्वारातून मुख्य रस्ता, आर्य चौकमाग्रे अहल्यादेवी होळकर विहिरीत शांत करण्यात आली. सुमारे ८० तरुणांनी पेटलेली भेंडोळी खांद्यावर उचलली, तेव्हा हजारो भाविकांनी ‘काळभरवाचा, टोळभरवाचा चांगभलं’, ‘आई राजा उदो-उदो’चा जयघोष केला. भाविकांनी नाणी, कुंकू व आर्य चौक येथे सुभाष शेटे यांनी पाच घागरी पाणी या भेंडोळीवर िशपडले. फटाक्यांची आतषबाजी करुन लोकांनी भेंडोळीचा आनंद घेतला. चोख पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रमुख मार्गावर सर्वत्र बंदोबस्त तनात होता.
तुळजाभवानी मंदिराच्या शिवाजी दरवाज्याच्या बाजूला असणाऱ्या दरीतून सुमारे १२५ पायऱ्या चढून काळभरवाच्या मंदिरात जावे लागते. मध्यरात्रीपासून सुमारे १० हजारावर तेलाचे अभिषेक घालण्यात आले. तुळजापुरात दिवाळी अमावास्येला हा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होतो. महंत मावजीनाथ बुआ व काळभरवाचे पुजारी यांना तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मानाचा आहेर व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी दिला.