राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटल्यापासून या दोन्ही पक्षांमधून विस्तव देखील जात नाही. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर सातत्यचाने टीका आणि टोलेबाजी होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा कलगीतुरा गेल्या दोन महिन्यांपासून पाहायला मिळत असला, तरी शिवसेना आणि भाजपा हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याप्रमाणे हा टोलेबाजीचा सामना त्यांच्यात सातत्याने सुरू असल्याचं दिसून येत आहे. राज्यात एकीकडे भाजपा आणि मनसे युतीच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाहीये. त्यात आता भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एक खुलं पत्र लिहून खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

“तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का?”

आशिष शेलार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून यासंदर्भात ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं एक खुलं पत्र शेअर केलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी भाजपाचा शिवसेनेकडून कमळाबाई अशा शब्दांत उल्लेख करण्याचा समाचार घेतला आहे.

jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
ravi rana bachchu kadu
“आम्ही तुमच्या खासगी गोष्टी बाहेर काढल्या तर…”, बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया

“प्रति, श्री उद्धवजी ठाकरे, संपादक, सामना… महोदय,. आपण आमच्या कमळाला हिणवायला ‘बाई’ म्हणताय? हरकत नाही. बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही आता ‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का?” असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. शिवाय पुढे “असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडेपण आहेत!” असा टोलाही लगावला आहे.

उद्धव ठाकरेंचा ‘शिवसेना पक्षप्रमुख’ म्हणून उल्लेख नाही!

दरम्यान, उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या या पत्रामध्ये त्यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न करता फक्त “संपादक, सामना” असाच उल्लेख आशिष शेलार यांनी केल्यामुळे त्यावरून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे ‘शिवसेना आमचीच’, असा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना दुसरीकडे भाजपाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रात उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न केल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.