“गोपीचंद पडळकरांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर…,” फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा

पडळकरांच्या जिवाला धोका, सरकारनं विशेष सुरक्षा द्यावी; फडणवीसांची उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मागणी

BJP, Devendra Fadanvis, Devendra Fadanvis Letter to CM Uddhav Thackeray, MLA Gopichand Padalkar, गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र
पडळकरांच्या जिवाला धोका, सरकारनं विशेष सुरक्षा द्यावी; फडणवीसांची उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मागणी

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसोबतच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांनादेखील पत्र पाठवलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला असून आझाद मैदानात कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मागणी करत आहेत.

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये हल्ला करण्यात आला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पडळकरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे पत्रात –

“बहुजनांच्या बाजूने उभं राहिल्यामुळे यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी,” अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

“गोपीचंद पडळकर यांच्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp devendra fadanvis letter to cm uddhav thackeray over mla gopichand padalkar security sgy

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या