मणिपूर या ठिकाणाहून सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतल्या शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर झाली. या सभेत इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार, राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी भाजपाला खडे बोल सुनावले. ज्यानंतर आता भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी उबाठा गटाची मशाल काँग्रेसच्या हाती दिल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“मी नेहमी सांगतो माझा देश हाच माझा धर्म आहे आणि आपला हा देश वाचला तर आपण वाचू. आपला देश हीच आपली किंवा एखाद्या व्यक्तीची ओळख असली पाहिजे. एका व्यक्तीवरून देशाची ओळख होता कामा नये. कोणी कितीही मोठा असला तरी माझा देश त्याच्यापेक्षा मोठा आहे. आपण म्हणतो हा माझा देश आहे, या देशाच्या सरकारला भारत सरकार म्हणतो. परंतु, ते लोक ‘मोदी सरकार, मोदी सरकार अशी जाहिरात करताय. तुमच्या डोक्यात माझ्या देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे का? भारत हे माझ्या देशाचं नाव आहे आणि आम्ही ते कोणालाही बदलू देणार नाही.” भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो अशी सुरुवात केली नाही. त्यावरुन भाजपाने त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. आशिष शेलार यांनी पोस्ट करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

Shinde Group Leader Criticized Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, सोनिया गांधींचे…”, शिंदे गटातल्या नेत्याची घणाघाती टीका
Loksabha Election 2024 Bhupesh Baghel Narendra Modi Gandhi-Nehru family Chhattisgarh
गोमांस विकणाऱ्यांच्या पैशांतून भाजपाचे झेंडे… – काँग्रेसचा आरोप
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…

हे पण वाचा- ‘मोदी सरकार चले जाव’ ; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांचा मुंबईत एल्गार, विरोधकांच्या प्रचाराचे बिगूल

काय आहे आशिष शेलार यांची पोस्ट?

आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला ? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल “मर्दा”सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का?
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का? सभा एक झालेय.. पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेलेय.. काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची “मशाल” आता खंजीर, वाघ, मर्द..कोथळा.. अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!!

अशी पोस्ट आशिष शेलार यांनी पोस्ट केली आहे. आशिष शेलार यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.